जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असताना बाष्पोत्सर्जनाचा दरावर होणाऱ्या परिणामाचा हरितगृहामध्ये प्रयोग करण्यात आला. वनस्पतींची दररोज वजने घेण्यात आली. (स्रोत ः अॅवट शेकूफा)
जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असताना बाष्पोत्सर्जनाचा दरावर होणाऱ्या परिणामाचा हरितगृहामध्ये प्रयोग करण्यात आला. वनस्पतींची दररोज वजने घेण्यात आली. (स्रोत ः अॅवट शेकूफा) 
मुख्य बातम्या

दुष्काळस्थितीत अधिक उत्पादनक्षम भुईमूग जातींचा अमेरिकेत शोध

वृत्तसेवा

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठातील संशोधक थॉमस सिंक्लेअर आणि सहकाऱ्यांनी भुईमुगातील पाण्याचा नेमकेपणाने वापर करणाऱ्या जातींचा शोध घेतला आहे. या जाती दुष्काळाच्या स्थितीमध्येही चांगले उत्पादन देण्यामध्ये सक्षम आहेत. भुईमूग पीक हे वालुकामय जमिनीत, अधिक ओलावा नसतानाही चांगले वाढते. मात्र, काही जाती दुष्काळाच्या स्थितीमध्येही चांगल्या प्रकारे वाढतात. मुळाच्या अवतीभवती पाण्याची कमतरता असताना या जाती पाणी कमी वापरतात. या सर्व बाबींचा उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठामध्ये बारकाईने अभ्यास करण्यात येत असून, दुष्काळामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात येत आहेत. याविषयी माहिती देताना थॉमस सिंक्लेअर यांनी सांगितले, की कमी पाण्यातही अधिक उत्पादन देणाऱ्या जाती भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या राहणार आहेत. वातावरणातील बदलामुळे पाऊस अनियमित होत असून, त्याचा फटका विविध पिकांना बसत आहे. ज्यावेळी जमीन कोरडी होत जाते, त्या वेळी भुईमूग वनस्पती आपले बाष्पोत्सर्जन कमी करते. त्यातून ती कमी पाण्याच्या स्थितीमध्येही चांगल्या प्रकारे तग धरू शकते. पिकाच्या सुरवातीच्या स्थितीमध्ये जमिनीतील आर्द्रता कमी असल्याची स्थिती झाल्यास पुढे येणाऱ्या दुष्काळासाठी वनस्पती पाणी साठवून ठेवण्यास सुरवात करत असल्याचे दिसून आले आहे.   संशोधकांनी भुईमुगाच्या जलसंवर्धन तंत्राच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी तीन प्रयोग केले.

  • पाण्याचा कार्यक्षम वापर ः हरितगृहामध्ये जल संवर्धनाचे गुणधर्म असलेल्या जातींची लागवड केली. हे गुणधर्म प्रत्यक्ष शेतामध्ये कशा प्रकारे काम करतात, याचा आढावा घेतला. दुष्काळाच्या स्थितीमध्ये पाने खराब होण्याची प्रक्रिया उशिरा होत असल्याचे दिसून आले. थोडक्यात, वनस्पतीमध्ये तेवढा अधिक पाण्याचा साठा केलेला असतो.
  • अधिक उत्पादनक्षमता ः ही रोप वाढू दिल्यानंतर त्यातून भुईमुगाचे उत्पादन घेतले. हे गुणधर्म असलेल्या जातींचे उत्पादन सामान्य जातींच्या तुलनेमध्ये अधिक असल्याचे दिसून आले. त्याविषयी माहिती देताना सिंक्लेअर म्हणाले, की दुष्काळाच्या स्थितीमध्ये अधिक उत्पादन देण्याची क्षमता असल्याचे भुईमूग जाती ओळखणे यातून शक्य झाले. उलट पाण्याचे संवर्धन करून उत्पादनाच्या वाढीसाठी वापरणारी एक भुईमुगाचा गट यातून पुढे आला आहे. या गटातील जाती सध्याच्या व्यावसायिक भुईमूग जातींच्या तुलनेमध्ये पाण्याच्या कमतरता असलेल्या स्थितीमध्ये अधिक उपयुक्त ठरतील.
  • नत्राचे स्थिरीकरण ः पुढील टप्प्यामध्ये भुईमुगातील नत्राच्या स्थिरीकरणाच्या गुणधर्मावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सूक्ष्मजीवांच्या सहकार्याने वातावरणातील नायट्रोजन मिळवण्याची प्रक्रिया ही जमिनीतील आर्द्रतेसाठी संवेदनशील असते. यापूर्वी झालेल्या अभ्यासामध्ये अमेरिकन भुईमूग जातींमध्ये दुष्काळाच्या स्थितीमध्ये हा गुणधर्म कमी होत असल्याचे आढळले होते. त्यामुळे पाण्याच्या कार्यक्षम वापरासोबतच नत्राच्या स्थिरीकरणाचे गुणधर्म असलेल्या जातींचाही शोध घेण्यात येत असल्याचे सिंक्लेअर यांनी सांगितले.
  • सिंक्लेअर हे स्वतः पीक शरीरशास्त्रज्ञ असून, पीक नेमके पाण्याचा वापर कशा प्रकारे करते यावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत. पाण्याचा कार्यक्षम वापर हा भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, अशाच जाती शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर राहणार आहेत. त्यांच्या या अभ्यासाचे निष्कर्ष क्रॉप सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

    Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

    Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

    Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

    Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

    SCROLL FOR NEXT